STORYMIRROR

Laxman Patkar

Abstract

3  

Laxman Patkar

Abstract

राजहंस

राजहंस

1 min
235

इतरांकडे पाहता पाहता स्वत:कडे पाहणे राहुन गेले..

मीच माझ्यातल्या राजहंसाला अन्यायाने दूर लोटले...


फळाफुलांनी बहरलेल्या झाडाला पाणी देणे बंद केले.

"का माझ्याकडे पाठ फिरवीलीे ?" असे विचारत झाडच ओशाळले...

"नाही जोपासलेस मला तरी 

सावली तुला देतच राहीन.

देणं हा माझा स्वभाव आहे 

घेणं न घेणं हे तुझ्या हाती आहे."


"सर्वांसाठी जगणं हेच माझे तत्व आहे.....ज्यानी 

ज्यानी मला सावरलं त्यांचा माझ्यावर हक्क आहे...

तुझा हक्क शाबूत ठेवणे मात्र तुझ्याच हाती आहे......"


"कष्टी का आहेस? जरा माझ्याकडे बघ............

ऊन वारा पाऊस झेलुनही मी स्वस्थ आहे बघ...

विसरू कसे मी तुला !! लावलेस तुच रोपटे माझे...

सावली देते सर्वाना म्हणून का अस्वस्थ होणे तुझे?"


बोलता बोलता झाडाने फळ खाली फेकले.....

पोट माझे भुकेले हे झाडाने जाणले...........

मुक्या त्या झाडाने खुप काही शीकविले....

दुर्लक्ष मी करुन देखील मायेने जवळ घेतले....


माझ्यातल्या राजहंसाला झाडानेच जागे केले...

हृदयातल्या भावनांनी..डोळे माझे ओले झाले.....

डोळे माझे ओले झाले!!..

डोळे माझे ओले झाले....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Laxman Patkar

Similar marathi poem from Abstract