Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prabhakar Pawar

Abstract Others

4.5  

Prabhakar Pawar

Abstract Others

जीवन संघर्ष

जीवन संघर्ष

1 min
360


जीवन संघर्ष ! कुणाला चुकला !

जो आला जन्माला ! मिळे त्याला.!१


जीवनाची वाट ! खाच खळग्यांची !

असे चालायची ! प्रत्येकाला.!२


ठेवावे उघडे ! लागतात डोळे !

परके आपले ! दिसतात.!३


मार्गदर्शन ते ! अनेक मिळते ! 

चालावे लागते ! स्वत:लाच.!४


कधी येते चढ ! कधी हा उतार !

ते अपरंपार ! मानवाला.!५


चढ प्रगतीला ! स्थिर उताराला !

मानव राहिला ! जय त्याचा.! ६


वाटचालीस ह्या ! नसतो दुसरा !

माझा मीच खरा ! तारावया.!७


सुखदुःख नित्य ! जीवनात लाभे !

सुंदरच शोभे ! मानवाला.!८


जन्माला पृथ्वीला ! सार्‍यांना सुखवी !

मृत्यूने दुःखवी ! गोतावळा.!९


येतांना रडला ! प्रत्येक विश्वात !

दुजे रडतात ! मृताशवे.!१०


सांगे प्रभाकर ! जीवन संघर्ष !

घ्यावा परामर्श ! प्रत्येकाने.!११


Rate this content
Log in