बाग
बाग
1 min
183
बागेतल्या फुलांनी वाकून कोण बघता
ती लाजली जराशी साैंदर्य खाण बघता
भीती तरारलेल्या डोळ्यात स्पष्ट झाली
स्थिरावल्या पदांनी दारी सहाण बघता
दगडास रंग दिसता मग हात जोडले मी
देवत्व पाहिले मी बुद्धी गहाण बघता
बाबा खरे समजले मी बाप जाहल्यावर
दारी अजून पहिली तुटकी वहाण बघता
एकास एक अक्षर डोक्यात साचलेले
ही लेखणी जगाया बलवान वाण बघता
