STORYMIRROR

Prabhakar Pawar

Thriller Others

3  

Prabhakar Pawar

Thriller Others

कोजागरी

कोजागरी

2 mins
307

या वर्षी कोजागरीच्या चंद्रमा तुला मी

दुसर्‍या मजल्याच्या खिडकीतून पाहिले

आता तू बदललेला वाटलास मला

ते सुखावह रूप मला दिसले नाही


खळाभर धान्य पसरल्यावर जसे चमकायचे

तो तुझा पूर्वीचा पिठूर प्रकाश कुठे गेला ?

ज्यात चिंब भिजतांना सर्वांना आनंद व्हायचा


तू इतका भव्य दिव्य प्रतिष्ठित होतास की 

कधी मान उंच करून बघायची हिंमत झाली नाही

तसेही आंबा खाण्यात खरी माैज असते

कुणी खेळत होते, कुणी गात नाचत असायचे


पण माझे लक्ष फक्त उकळत्या दुधावर असायचे

तू दुधात नाचतांना खूप सुंदर दिसायचास

मला सुरवातीला क्वचितच गरम दूध मिळायचे

कारण तू दुधाला लवकर आटवून देत नव्हतास

आणि मला झोप लागून जायची


एका वर्षी फळीवरची ती वाटी स्वच्छ केली

बर्‍याच वर्षापासून तेथेच धूळ खात पडली होती

हातात वाटीसह बाहेर आलो चांदणे पडले होते

पण तो पिठूर नावाचा प्रकार त्यात दिसला नाही

आजू बाजूच्या वीजेच्या दिव्यांनी तुला फिक्कट केले होते

ह्रदयाचा थरकाप उडवणार्‍या आवाजात सर्व नाचत होते

दुधाचा उकळत असतांना येणारा दरवळ कुठे दिसलाच नाही मला

वडे भज्यांचा त्यातच चायनिज खाद्य पदार्थाचा तेलकट उग्र वासाने डोके भणभणले माझे

पुन्हा एकदा हातातल्या वाटीची क्षमा मागून, झोप येत नसतांना झोपी गेलो


लहाने सारेच तुला मामा बोलतात

तारुण्यात तेच तुझ्या रुपावानी जोडीदार मागतात

तुझ्यासारखा चंद्र मीही तारुण्यात मागीतला होता

तो आता ऐन चाळीशीत गरगरीत झाला असेल

आणि सुंदर दिसायला भक्कड मेकअप केला असेल

कालाचा प्रवाह ना तिच्यासाठी थांबला ना माझ्यासाठी 


कदाचित तू बोलशील 

"लहानपणी मूग गिळून बसणारा हा. अचानक भीड कसा त्यागू शकतो. ."


कारण मला समजले आहे. 

या अगोदर कित्येक वर्षापासून तू आहेस आणि राहणार

पण माझाच भरोसा नाही

चालता बोलता अनेकजण एकटा सोडून जाऊ लागले

आणि आता वेदनेच्या हुंकारात तसा राम राहिला नाही


कदाचित कालाच्या प्रवाहात मी बदललो असेल

पण मूग गिळून बसायचे सोडले आहे मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller