STORYMIRROR

Prabhakar Pawar

Others

4  

Prabhakar Pawar

Others

आठवतय का मित्रा

आठवतय का मित्रा

1 min
411

पारंब्यांचा बांधलेला झोका

उंच फांद्यावरचा पक्ष्यांचा गळका

अनेक पिढ्या अनुभवला वड

तेथे जमवलेला गप्पांचा फड

आठवतय का मित्रा. .


पावसाळ्यातली घसरगुंडी

सोललेली ढुंगणाची चामडी 

गळावर उडवलेले छोटे मासे

खेकड्यांनी तोडलेले गळाचे फासे

आठवतय का मित्रा. .


सायकलच्या टायरचा गाडा

पोटात दुखते म्हणून शाळेचा खाडा

विसरलेला तेराचा पाढा

पाठीवर फोडलेल्या छडीचा धडा

आठवतय का मित्रा. .


सोडली होती कधी चड्डी कुणाची 

बरसात केली होती त्याने दगडाची

नेमबाजी शिकता फोडलेली टमरेल

ग्रामीण शिव्यांची अदा नखरेल

आठवतय का मित्रा. .


गावातल्या आज्यांच्या शिव्या

त्यांनीच मोठ्यात गायलेल्या ओव्या  

शर्यतीत सापडवलेली पंगत

घासाबरोबर ऐकलेली श्लोकांची रंगत

आठवतय का मित्रा. .


व्यालेली काळीभोर कुत्री

आपल्यातली कळसूत्री 

शेतातला क्रिकेटचा ग्राउंड 

मुद्दाम काढलेला विचित्र साउंड 

आठवतय का मित्रा. .


गायलेली बेसूर आरती

जोराने वाजवलेल्या पराती

अंधारातल्या वराती

व्हिसिआर पहायला जागलेल्या राती

आठवतय का मित्रा


लग्नातला नागीण नाच

फोडलेल्या बल्बाची काच

हायस्कूलच्या बाजूची आबंड बोरं

विहिरीत उड्या मारणारी नागडी पोरं

आठवतय का मित्रा. .


होळीत खेळलेली कबड्डी 

हाकललेली बैल गाडी

मासे पकडायला वापरलेली साडी

चोरून पिलेली ताडी

आठवतय का मित्रा. .


चोरून फुंकलेल्या विड्या

मुलामुलींच्या ठरवलेल्या जोड्या

जाणूनबुजून काढलेल्या खोड्या

आपल्यात एखादा असायचा जाड्या

आठवतय का मित्रा. .


टिप :- कवी सुरेंद्र लोढा यांच्या कवितेवरून सुचलेली कविता. .


यहा कुछ तो अच्छा रहने दो

बच्चे को बच्चा रहने दो



Rate this content
Log in