STORYMIRROR

Prabhakar Pawar

Others

3  

Prabhakar Pawar

Others

मन

मन

1 min
164

आज इथे उद्या तिथे

मन उधानला वारा 

ओझे विश्वाचे वाहते

मन फाफट पसारा. .१


नको ते सोडले नाही

दु:ख जोडले संगती

हरपली शांत झोप

विचारांच्या त्या पंगती. २


सुख शेजार्‍याचे नित्य

होते मला जड भारी

त्याच्या दारातली गाडी

छळे माझ्या मना दारी. .३


कुठे पाहिली औकात

स्वप्न बाळगले नवे

त्यास साकरावयास

उणे कर्तृत्व आडवे. .४


माझ्या शिवाय कुणीही 

मला दु:ख ना देणार

देतो मी विश्वाला काही

तेच मला मिळणार. .५


Rate this content
Log in