STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Fantasy Thriller

4  

Rohit Khamkar

Classics Fantasy Thriller

यशाचा या साज

यशाचा या साज

1 min
309

काय झाला तो अपमान, काळजा घोर लागलिया आज

पेटून उठलो ऐसा, लागला यशाचा या साज


संपलो असेल मी आज, वाटली मना केव्हा लाज

लाभ घेऊनी मिरवीतो, आपुलकीचा या माज

मरदुमकी म्या गाजवीतो, मनमानी माझा ताज

पेटून उठलो ऐसा, लागला यशाचा या साज


असा विरोध कधी न झाला, तारीख आहे आज

पराभव तो हसत स्वीकारी, असा माझा बाज

साऱ्यांना तो इतिहास आठवेल, करतील सारे नाज

पेटून उठलो ऐसा, लागला यशाचा या साज


मोठं मोठं बोलुणीया, वर्तवीले ते मोठे गाज

काऊन बोलो होतो असे, आली कशी ही खाज

दाविले ऐसे वाटले, होते एक ते राज

पेटून उठलो ऐसा, लागला यशाचा या साज


चुकांच्या या ऊधाराचा, एकदाचा वाजला तो झाजं

बुद्धी अशी जुकलेली, लागला तो गंज

चांगुलपणाच्या विचारांचा, डोस तो ग पाज

पेटून उठलो ऐसा, लागला यशाचा या साज


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics