नवरा म्हणजे नवरा असतो
नवरा म्हणजे नवरा असतो
नवरा म्हणजे नवरा असतो
बायकोच्या हातातला तो, भवरा असतो
.
बायकोच प्रेम मिळवताना
त्याची पिळवणूक फार होते
तिच्या प्रेमापोटी काम करताना
त्याची छळवणूक फार होते
.
कधी कधी ..
ऑफिस मधून घरी येताना
ते गजरे आणावे लागतात
अन
रोज तिचे ते रट्याळ
नखरे पहावे लागतात
.
काय मिळल ते खायला,
ते गप खावं लागतं
खाताना हसरया चेहरयाने
तिच्याकड पहाव लागतं
.
तिच्या रूसव्याच फुगव्याच कारण
कधी कधी कळत नसते
अन तिच्या शिवाय आपल्या
आयुष्याच पान मात्र वळत नसते
.
बायको अन आईच्या भांडणात
मरण मुलाचेच होत असते
तेव्हा त्याच्या मनाला समजणारे
तिरसे तिथे कोणी नसते
.
टिव्ही वरचे ते डेली सोप
बळजबरी ने पहावे लागते
त्या डेलीसोप मुळे,
बातम्या तर सोडाच
पण सालं क्रिकेटलाही मुकावे लागते
.
मी सांगतो कि हो
.
नवरा म्हणजे नवरा असतो
आई ने जपलेला
अन
बायको ने फिरवलेला
तो भवरा असतो
.
बाहेर कितीही सुंदरी पाहिल्या तरी
आपल्या घरी मात्र आपली सुंदरी असते
बरी का होईना
पण
आपली बायको ही आपली परी असते
