वृद्धाश्रमाच्या वाटेवर
वृद्धाश्रमाच्या वाटेवर
वृद्धाश्रमाच्या वाटेवर
आईला घेऊन जाताना
आठवलं नाही का रे
काही मागे वळून पाहताना
एकदा फक्त वाटलं तर
थोडा तू ही विचार कर
आईच्या मरण यातनांचा
कसा पडला रे तुला विसर
बायको मुलगा यांच्यातच
रमशील तू रे बिनधास्त
मातृप्रेमास मुकशील
मिळेल का कुठे स्वस्तात ?
तडजोड सारी करायला
आहे मी नक्की तयार
पण का वेगळं करून
करतोय तू हा प्रहार?
वडिलांच्या मागे तू
पाडलेस मला एकटे
पैसे नको काही नको
मन तुझ्यासाठीच झुरते
भीती मात्र याची वाटते
मुलगा तुझा हेच शिकेल
मोठेपणी तो ही तुला
वृद्धाश्रमात नेऊन विकेल
असतील सगळे सोबत
पाठवेल थोडेसे पैसे
पण मुलाच्या नसण्याने
तू जीवन जगशील कैसे ?
माझा तू आता सोड रे
करत असलेला विचार
नकळत माय - बापांना
तोडण्याचा केला संस्कार
शेवटी मात्र हेच सांगेन
काळजी घे रे स्वतःची
भोगशील मोठी शिक्षा
तुझ्या एका निर्णयाची
