STORYMIRROR

Nishigandha Upasani

Inspirational

4  

Nishigandha Upasani

Inspirational

लग्नघटिका

लग्नघटिका

1 min
298

वय तुझे सरले अन,

समीप लग्नघटिका.

साथ सोडून बापाची,

जाणार ही लतिका.


डोळ्यात असे अश्रू,

अन जोडीदार साथी.

बेटा जप ह्या लेकीला,

जणू फोडच तळहाती.


सगळ्यात अस्वस्थ,

माणूस असे "बाप".

आनंदासह दुःखास,

नसे कुठलेच माप.


हात सजले लेकीचे,

शकुनाच्या मेंदीने.

वस्त्र वधुवरांचे ते,

बांधले एका गाठीने.


मंगलाष्टकांचे गूज,

गाजले या मंडपात.

अश्रू ओघळल्याने,

उरी झाला आघात.


सप्तपदी करतानाच,

अनेक घेतली वचने.

एका क्षणात जोडली,

जन्मांतरीचेच बंधने.


आता आली वेळ ही,

पुण्यमय कन्यादानाची.

आतुरता असे मनाला,

दोन कुटुंब मिलनाची.


सूनमुख बघण्याची,

सासूबाईंना ही घाई.

अश्रू लपवत हळूच,

रूप न्याहाळते आई.


बाळा सातत्याने तू,

घ्यावीस उंच भरारी.

सारे धीटाने सांभाळ,

आहेसच ग तू करारी.


आज दूर जातो आहे,

काळजाचा हा तुकडा.

नेटाने संसार करून,

सुखी क्षणांना पकडा.


लेक दिलीस म्हणुनी,

आहे देवाचा आभारी.

संस्कारी माझी लेक,

प्रकाश देई दोन्ही घरी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational