STORYMIRROR

Nishigandha Upasani

Others

4  

Nishigandha Upasani

Others

नारीशक्ती

नारीशक्ती

1 min
484

नारीशक्ती तू आजची,

विचारधारच उद्याची.

पूर्तता करी स्वप्नांची,

शिदोरी ही संस्कारांची.


आस धरी ती नव्याची,

माताच जणू जगाची.

खाण असे सौंदर्याची,

लाडकी लहान-थोरांची.


भासते झुळूक वाऱ्याची,

कुशीच माया-ममतेची.

प्रेमवेलच तू नात्यांची,

नाळ जोडतेस हृदयांची.


धरतेस कास विज्ञानाची,

भाकरी थापतेस कष्टाची.

मैत्रीण होतेस साऱ्यांची,

नांदी नव्या इतिहासाची.


सावली जणू हक्काची,

प्रकाशज्योत ज्ञानाची.

दिशा देते नवं प्रगतीची,

शान असे ती कुटुंबाची.


मनात जागा पावित्र्याची,

गर्भात पहाट ती उदयाची.

ताकद असे तू संसाराची,

सतत चाहूल अस्तित्वाची


Rate this content
Log in