नाते/नाती
नाते/नाती
जशा जशा बसतात लोकांशी गाठी,
तशी तशी फुलतात सुंदर नाती
होतात जनांशी वारंवार भेटीगाठी,
तशीच वाढते एकमेकांतील प्रीती
नात्यांमध्ये असतो मायेचा ओलावा,
झोपाळाही हाच अलगद झुलावा.
नात्यांचा निशिगंध हळुवार फुलावा,
कधीहि येऊ नये विनाकारण दुरावा
बांधावा सहज नात्यांचा रेशमी बंध,
दरवळत जावा त्याचा मंद सुगंध
नात्यांनी भरावे आयुष्यात रंग,
शोधूनही सापडू नये कुठलेच व्यंग
नात्यांमध्ये असावे रुसवे फुगवे,
साथीने करावे हसण्याचे देखावे.
कधीतरी उघडावा मनाचा कोपरा,
नाती बघून चेहरा व्हावा हसरा
नाती बनवून वाढवावा हर्ष,
नात्यांना असतो ममतेचा स्पर्श.
असावे एखादे नाते सुंदर गोड,
एकमेकांच्या भेटीची लागावी ओढ
मिळतात हात देतात साथ,
हीच असते नात्याची सुरुवात
एकत्र द्यावे एकत्र घ्यावे,
नाती हेच जगण्याचे मर्म मानावे
नसतील जर नाती,
विसरेल हि माती.
थोडे जगूया एकमेकांसाठी
जरा बाजूला ठेवा फोन,
सोबत बोलूया अक्षरे दोन
माणूसच माणसापासून गेला दूर,
दूर गेली नाती बदलला नूर
नाती झालीत जड,
दुःखासाठी नाही कड
एकटेच झुरते हे मन,
नाती आहेत खरं धन
