STORYMIRROR

Nishigandha Upasani

Classics

3  

Nishigandha Upasani

Classics

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
415

पाऊस हा हवासा छेडीत चिंबणारा

मोहोर पालवीचा झाडात डोलणारा


दाटून मेघ येता झोकात गर्जणारा

गंधास भावनांच्या अलवार शोधणारा


पाऊस काळजाला हळुवार झोंबणारा

थेंबात आसवांना मापात तोलणारा


मी शोधला किनारा स्पर्शात भावणारा

हा पाश चातकाचा मोहात गुंतणारा


फुलवूनिया पिसारा प्रेमात जागणारा

हा खेळ मोरणीचा नृत्यात साठणारा


पाऊस कोसळे हा रंगात रंगणारा

पहिल्याच पावसाला थेंबात माळणारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics