STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Fantasy Thriller

4  

Rohit Khamkar

Classics Fantasy Thriller

नेमकी कोणाची काढू खोड

नेमकी कोणाची काढू खोड

1 min
393

विषय एवढे झालेत लिहायला, सांगा कश्याची लाऊ जोड.

लिहायला खुप आहे पण, नेमकी कोणाची काढू खोड.

प्रत्येकजण ताकतीच्या नशेत, वाटतं नाही कोनी आहे तोड.

मिळालाच वरचड कोनी, तर तात्पुरता अहंकार सोड.

स्वतः भोगलं की वाटतं, माझ्याच नशीबी का मोड.

लिहायला खुप आहे पण, नेमकी कोणाची काढू खोड.

महागाई आठवली की सुचतं, मागचं सगळं काही सोड.

ज्यांच्या मूळ सारं झाल, त्यांच्या साठी माथी फोड.

चुकीचा रस्ता निवडला, पश्चाताप शेवट तरी कर गोड.

लिहायला खुप आहे पण, नेमकी कोणाची काढू खोड.

भेसळ झाली सगळीकडे, त्यात दलाली तुझी जोड.

लोकांच्या घरी शिमगा करू, कायम दिवाळी तू झोड.

सोडून जायचय सगळ्याना, ज्यास्त जगण्याची आशा सोड.

लिहायला खुप आहे पण, नेमकी कोणाची काढू खोड.

सोडून सारं वाईट, सत्याची बाजू जवळ ओड.

सेवा भावना मनात ठेऊन, परमआत्म्याशी बनव जोड.

श्वास शेवटचा घेताना, उलगडेल सर कोड.

लिहायला खुप आहे पण, नेमकी कोणाची काढू खोड.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics