Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Gorivale

Tragedy Thriller

4  

Rajesh Gorivale

Tragedy Thriller

आयुष्याची कलाकारी

आयुष्याची कलाकारी

1 min
314


आयुष्य म्हणजे काय असतं,कुणालाच ते माहीत नसतं,

जगणं खूप सुंदर असतं, आपलं मोल कधीच ठरवायचं नसतं ||


रोजचा दिवस नवीन भासतो,

पण सर्वानाच तो हवा-हवासा वाटतो,

नात्यातील दोर नेहमीच घट्ट करतो,

अन् अनोळखी मने हृदयी गुंफून ठेवतो ||


दुःखाचे सारे भोग भोगायला लावतो,

तसाच सुखाचे क्षणही अनुभवायला देतो,

कुणाचे वर्तमानात भरभरून कौतुक करतो,

तर भविष्यात खलनायकही तोच ठरवतो ||


आयुष्याच्या रंगमंचावर सगळेच रंग असतात,

कधी तेच रंग रडवतात, हसवतात आणि फसवतात,

जीवनाच्या पदपथावर ठेचा लागणं यात गैर काही नसतं,

जीवन कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असतं ||


आयुष्य म्हणजे काय असतं,कुणालाच ते माहीत नसतं,

जगणं खूप सुंदर असतं, आपलं मोल कधीच ठरवायचं नसतं ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy