STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

वादळास...

वादळास...

1 min
238

वादळास काय तोलले मनी

वाट प्रकाशली धुक्यातली

काळाच्या ओघात रात्र कोणी

उद्याच्या आशेत झोपी गेली..

नित्याची झाली वादळे जीवनी 

पाऊलवाट ओळखीची झाली 

सवयीची झाली ठेच जन्मानी

जखमांची ती काळजी कसली 

नभाची आद्रता भरली जीवनी 

धरेची उदारता ह्रदयी जपली 

माणसांत माणुसच म्हणूनी 

एखाद पाऊल माघार घेतली 

आज सूर्य अस्तास जातानी 

मन अस उगाच का सांभाळी 

काळाच्या त्या गर्तेत अडकुनी 

स्वप्ने नयनात अजुनी जपली

नित्या चा वारा झुंजार जीवनी 

नेहमी जगण्यास न अवघडली

फितुर जाहली हवा ती जाणुनी 

रित ती जगण्यास न चुकली 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance