निरागस बालपण
निरागस बालपण
जीवन आहे महान,सुंदर असं ध्यान,
म्हणजेच बालपण....
निरागस हसतं आयुष्याचं ते पान,
आईचं ते प्रेम अन् वडिलांचा राग,
म्हणजेच बालपण....
मित्र- मैत्रिणींशी झालेली गट्टी,
हसऱ्या मनाने वाजवलेली शिट्टी,
म्हणजेच बालपण....
खेळता-बागडता सरलेलं लहानपण,
तारुण्यात येताना आलेलं शहाणपण,
म्हणजेच बालपण....
देवाचं ते देणं,बालकातील देवपण,
मुक्या मनाने जगलेले ते सुखी क्षण,
म्हणजेच बालपण....
