माय माऊली
माय माऊली
धन्य धन्य ती "माझी आई",
तिच्याशिवाय माझे विश्वच नाही ||
उदरातील यातना सोसुनी तिनेच मला वाढविले,
तिच्या त्या वेदना आता मज कशा ना कळे ||
माझी आई असे भगवंत सम माऊली,
कोरड्या माझ्या जीवनी दिली तिने उबदार सावली ||
तिच्या ममतेची माया मज वाटे स्वर्गाचा दरवाजा,
कष्टाची नेहमी तिला का हो मिळतसे सजा ||
एकत्र कुटुंबाचा डोलारा तिने सक्षमतेने पेलला,
या जगी आईपेक्षा मोल दिसे ना मज कशाला ||
धन्य धन्य ती "माझी आई",
तिच्याशिवाय माझे विश्वच नाही ||
