STORYMIRROR

Rajesh Gorivale

Others

3  

Rajesh Gorivale

Others

जगण्याची आस

जगण्याची आस

1 min
125

मरता मरता वाचलो

अन् वाचता वाचता जगलो


कधी कुणावर प्रेम करता

आपणच उगाच त्यात फसलो


कष्ट करूनी वाटतं आता

आपण सारं जगच जिंकलो


मागे वळून काही पाहताना 

जिंकण्याच्या नादात उगाच भरकटलो


जिद्द आहे ऊरी लढण्याची

मग का करावे हरलो की जिंकलो


कुणी साथ देवो की न देवो

हार न मानता आजही प्रयत्नांनी लढलो 


गर्व कशाचा आता नाही मनी 

आयुष्याच गणित बरोबर सोडवत राहिलो 


मरता मरता वाचलो

अन् वाचता वाचता जगलो


Rate this content
Log in