नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सव
जय अंबे,जय अंबे, हे जगदंबे,
जय अंबे,जय अंबे, हे जगदंबे,
घालू मंडप या अंगणी,आई येईल आपल्या घरी,
नवरात्रीच्या सणाला,नवरात्रीच्या सणाला
घटी बसवूनी देवीला,आनंद झालाय जनाला...
नऊ दिसाचे उपवास मनोभावे करती,
फुले आणि ओटी भरुनी पूजा आईची करती,
लावूनी हळद-कुंकू तिला आम्ही स्मरतो,
नवरात्रीच्या दिवशी नैवेद्य आईला भरवतो,
अश्या या मंगल समयाला नाम जपती क्षणाक्षणाला,
घटी बसवूनी देवीला,आनंद झालाय जनाला...
चंडिका,काळभैरवीचे रूप आईने घेऊनी,
महिषासुर दैत्याला टाकिलें मारूनी,
पाहा कित्येक रूपे घेतली आईने धरुनी,
बसली नऊ दिसाच्या घटाला येऊनी,
कळला देवीचा हा महिमा साऱ्या देव गणला,
घटी बसवूनी देवीला,आनंद झालाय जनाला...
असा निराळा माझ्या आईचा हा थाट,
ओवाळीतो हाती घेऊनी आरतीचे ताट,
जाती जाळून साऱ्यांची दुःखे या नऊ दिसात,
गजर केला आईचा उदो उदो या सुरात,
नवरात्रीच्या सणाला आई प्रसन्न होई प्रत्येकाला, घटी बसवूनी देवीला,आनंद झालाय जनाला...
जय अंबे,जय अंबे, हे जगदंबे,
जय अंबे,जय अंबे, हे जगदंबे,
घालू मंडप या अंगणी,आई येईल आपल्या घरी,
नवरात्रीच्या सणाला,नवरात्रीच्या सणाला
घटी बसवूनी देवीला,आनंद झालाय जनाला...
