STORYMIRROR

Rajesh Gorivale

Thriller

3  

Rajesh Gorivale

Thriller

खोडकर पाऊस

खोडकर पाऊस

1 min
150

जीवनी असे कधी आसू तर कधी हसू, 

खोडकर पाऊस मन रिझवी नभी बरसू...


निरागस बालकासारखे अवखळ होऊनी,

खेळूनी,बागडूनी अन् रडूनी करी पाणीच पाणी,

आयुष्यातील जीवनाचे हे आनंदाश्रू,

खोडकर पाऊस मन रिझवी नभी बरसू...


आकाशातील मोती पाडी या धरतीवरी,

भरुनी रांजण जना पुरता सुखी करी,

आयुष्यातील जीवनाचे हे आनंदाश्रू

खोडकर पाऊस मन रिझवी नभी बरसू...


सरींवर सरी पेरूनी,निसर्ग सारा बहरुनी,

देह आपला भिजवूनी,मनी हर्ष मोहरूनी,

आयुष्यातील जीवनाचे हे आनंदाश्रू,

खोडकर पाऊस मन रिझवी नभी बरसू...


खट्याळ,उनाड,मनमौजी उपमा त्यालाच त्या शोभे,

गगनातील इंद्रधनुष्य येऊनी जीवनी रंगी साजे,

आयुष्यातील जीवनाचे हे आनंदाश्रू,

खोडकर पाऊस मन रिझवी नभी बरसू...


जीवनी असे कधी आसू तर कधी हसू, 

खोडकर पाऊस मन रिझवी नभी बरसू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller