दिसते खिडकीतून आकृती
दिसते खिडकीतून आकृती
रोजच मला एक
दिसते खिडकीतून आकृती ।
वाटलं मला ती
असावी कुठलीशी विकृती ।
बोलावते मला ती जवळ
मनही मग देते स्वीकृती ।
हळुवार स्पर्श तिचा मज
देई आनंद तिची ती कृती ।
हळुवार पणे घेते
ती आपल्या मज कुशीत ।
रात्र सारी कशी जाते
असते मन माझे खुशीत ।
पहाटेला येता जाग
कळते असावे एक गुपित ।
हवी हवी वाटे मज
मन अडकले कुठल्या चुकीत ।

