महापूर
महापूर


का गं कृष्णामाई तू एवढी रागवलीसं?
रोजचा रस्ता सोडून तू थेट गावातल्या घरा-घरातच अवतरलीस।।१।।
काय झालं असं तू एवढी खवळलीस?
लेकरांच्या चूका पोटात घेणारी तू आई,
आज अशी कशी लेकरांनाच कवेत बुडवून बेभान होऊन वाहू लागलीस।।२।।
ह्या तुझ्या तांबड्या मातीतच कित्येक नेते-अभिनेते तू घडवलेस,
अवघ्या महाराष्ट्रास तू श्रोते केलेस,
आता काय गं हे; तांबड्या मातीचा असा लाल चिखल करून चाललीस।।३।।
कष्टानं, गरजेनं, हौसेनं तर कुणी हट्टानं थाटलेले संसार
एका क्षणार्धात नाहीसे करून चाललीस तू।।४।।
गावकऱ्यांची व्यथा पाहूनं मनात माजलय गं काहूर,
पुरे कर गं आता; कृष्णामाई तुझा हा महापूर।।५।।
तुझे हे रौद्ररूप पाहून, भरून येतंय गं ऊर,
पुरे कर गं आता कृष्णामाई तुझा हा महापूर।।६।