STORYMIRROR

Bharati Sawant

Thriller

3  

Bharati Sawant

Thriller

सुखी जीवन

सुखी जीवन

1 min
231

जन्मदिन आज तुझा

देते प्रेमाने मी शुभेच्छा

सुख शांती तुला लाभो

पुर्ण व्हाव्या सर्व इच्छा


मोहिनी तू कार्यतत्पर 

सर्व कामामध्ये कुशल

कवयित्री तुझ्यातलीही

होऊदे जगी सर्व सफल


आलेख तव काव्याचा

जाईलच नित्य उच्चतम

लेखणीतूनीच भावविश्व

होऊ देत व्यक्त अत्युत्तम


सुखी व्हावे आयुष्य तुझे

रोजचा दिन व्हावा पवित्र

जोडून नवनवी नाती अन्

वाढावेत परिवार नि मित्र


ठेव जीवनाच्या वाटेवरती

उच्च अपेक्षा आणि आशा

फुलू दे हास्य तव मुखावरी

नसावी जीवनात निराशा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller