तू ये ना जरा तू ये ना जरा
तू ये ना जरा तू ये ना जरा
तुझ्याविना तुझ्याविना
ना कर्मे मला ना राहावे मला
तू ये ना जरा तू ये ना जरा
थोडीशी तुजी येण्याची
चाहूल मला दे ना जरा
तुला बघितल्यावरती
माझे मन भारावून जाते
तुझ्या ओठांमधून शब्द
ऐकायला कान माझे तरसुनी जातात
तू ये ना जरा तू ये ना जरा
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये
तुझ्या प्रेमाचा गंध दरवळतो
फुलपाखरांप्रमाणे
सर्वांना मोहीत करून जातो
तू ये ना जरा तू ये ना जरा
तुझ्या चेहऱ्यावरील हसू
बघायला डोळे माझे आतुरतात
तुला सांगताना मात्र
शब्द माझे संपुनी जातात
तू ये ना जरा तू ये ना जरा
थोडीशी तुझी येण्याची
चाहूल मला दे ना जरा