STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Thriller

3  

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Thriller

सोळा शृंगार...

सोळा शृंगार...

1 min
300

सोळा शृंगार करूनी

लक्ष्मीच्या पावलांनी

तुझ्या आयुष्यात 

सजना मी रे आले


नववधू मी बावरते रे

अडखळते सावरते

तुझ्या विचारांनी

मनास भुरळ ही पडते


नेसले भरजरी हा शालू

नाजूक हातावरी खुलला

रंग गहरा मेहंदीचा

जणू तुझ्याच प्रेमाचा


बरसेल बघ काळ्या 

काजलच्या ढगातून प्रेम

भाळीचे कुंकू ही मग होईल

लाजुनी आणखी लाल


सख्या हा सारा रे

सोळा शृंगार 

फक्त तुझ्याचसाठी

अन तू माझ्यासाठी


कित्येक स्वप्ने आहे मनी

तुझेच मोहक रूप ध्यानी

लाजले रे आरशात 

स्वतःलाच पाहुनी


मिलनाची रात समीप

मोहरले रे अंग-अंग

तुझ्यासोबतीने माझ्या

आयुष्यात येईल रे रंग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance