कोसळली वीट
कोसळली वीट


विठ्ठला काळोख्या रात्री,
तुझा नामाच्या गजराने मंदिर उजळून दिसे.
जय जय राम कृष्ण हरी,
या ओसाड गावात विठ्ठला तुझी पंढरी.
दंग होई तुझ्या भजनात, लिहितोय विटंबना
थकलेला मी तुझा वारकरी..
चिमणीच्या ठीमक्यावर, दिव्यांग चमकून पेटे.
सूर्य ही दिपेल, असा तेजस्वी सोहळा नगरीत पेटून उठे
टाळाच्या तालाने, कित्येक रात्री हरीनामा तूला झोपू नाही दिले.
भजनात तल्लीन होऊन गाईले अभंग, आम्ही तुझा सोबत तुझे मंदिर ही डोले..
गावे तुझे अभंग कमी पडे साम,
सकाळ उठून वावरात आनंदाने मी करी काम.
आता डोळे थक्क होतात, तुझ्यावर वारकरी रुसतोय.
त्या मंदिराच्या मागे बाटल्यांचा आवाज घुमतोय.
हरीराया,
असं वाटतंय काळजामध्ये खिळा टोचावा,
तो आवाज पांडुरंगा तुझ
ा कानात जावा,
पेटून उठाव तू..
या चांडाळाना रक्ताच्या उलट्या व्हाव्या.
तो गंजलेला वळचणीचा टाळ उचलून देवा
त्यांनी तुझा अभंग गावा...
नाम तुझे कसे विसरले रे मायबापा,
बापाची गळ्यातील माळ लेकाने धिक्कारली रे, जग जेथा.
आता तेच टाळ वळचणीचं सामान बनून, भंगारची
शोभा वाढवतायत.
जसं काय, या गावचे तरुण अंगार, व्यसनाच्या आहारी जाऊन रोज बुजतायत.
अरे वारकरी मी तुझा, नसा, तुटल्या वाजवून हा मृदुंग
ही परंपरा आता रडकी न व्हावी,
रक्ताचं कुंकू करून माथ्याला लावीन गात राहीन तुझा विद्रोही अभंग.
टाळ नसेल, नसेल मृदुंग, नसतील हे नासके कीडे,
ये हरी तुझी अपरंपार गीत गात राहीन चोहूकडे,
कित्येक चुका उरात घेशील, हे जग रचिता
दाखव यांना, नामदेवी रस्ता...