साल हे आता मळू दे!
साल हे आता मळू दे!
साल हे जाता मळू दे.
प्रेम ते आता कळू दे.
चांदण्याची साथ नाही.
रातिला वाता जळू दे.
ओढणीला चांदण्याला.
घेउनी हाता ढळू दे.
शेगडीला सोनताबे.
ओठि तो भाता वळू दे.
सोम नेत्रे तू दिले ते.
शायरी गाता, हळू दे.
छेडणे ते जाणुनी तू
जागुनी राता टळू दे.
सोनमृगी रात आल्या.
कांचनी राता गळू दे.
(सोनताब = सोने तापविल्यावर पाण्यात न बुडविता तसेच निव देणे)

