STORYMIRROR

Rahul Kande

Romance

3  

Rahul Kande

Romance

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे...

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे...

1 min
339

साठवलेले क्षण राणी वेचत बसतो हल्ली,

आधी तुही होतीस आता मात्र एकट्यानेच त्या क्षणांत रुजावे,

तुला विचारतोय सांग तरी..?

तुझ्या वाचुनी मी कसा नव्याने जगावे.

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे... //१//


असे जरी सोबती कल्लोळ तुझ्या आठवांचा,

तुझ्यावाचून एकटेपण कसं गं मी सहावे.

निंदा झाली प्रेमाची तु मी वेगळे होऊनी,

विरहात ढकलुनी आम्हा कधी तुम्हीही भरावे.

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे... //२//


केवीलवाण्या डोळ्यात तुझ्या पाहत असे मी तारे,

नयनी तुझ्या हळूच कधी अश्रू पाझरावे.

चाहूल तुझी आजही येते अन मन येते भरुनी,

प्रश्नात पडतो तेव्हाच तेव्हा यातून कसे मी सावरावे.

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे... //३//


शुक्र तो तारा मंद तो वारा होते ग्वाही भेटीचे,

सुन्न त्या आठवणी डोळ्यात तुझ्या कधी तुही पांघरावे.

स्पर्शात तुझ्या होती जादू ते देई नेहमी शहारे,

शहारलेले अंग तुझे तेच तर माझे प्रेम पुरावे.

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे... //४//


कसला आता वसंत ऋतु वसंत सुद्धा कोरडा,

गेलीस जशी तु तर आता त्याला का मी पूजावे.

अगं तु होतीस तोवरच गोडवा होता,

आता बघ माहित नाही कसे हसावे.

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे... //५//


चारही दिशा अंधारल्या आता शोधात राहील कारण,

मनाची चिंता ऊरी घेउनी कुणाशी मी जुडावे,

वाटले नव्हते सहजा सहजी वेळ अशीही ओढून जाईल,

नाकारताही येईना जणु स्वप्नच हे ठरावे.

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे... //६//


व्यथा आता कुणा सांगू कोण उमजून घेणारं,

फसलीस निर्णय घेऊन आता आयुष्यभर फसावे,

आठव ते दिवस नाकारून कसे चालेल,

निरागस त्या आपल्या दिवसात कधी तुही न्हाहून जावे.

दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे... //७//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance