STORYMIRROR

Shalu Krupale

Romance

3  

Shalu Krupale

Romance

भेट

भेट

1 min
202

अकस्मात भेट

अशी घडलेली

काहूर मनाची

अति वाढलेली...!!


येणार साजणा

घेणार मिठीत

बेधुंद होणार

मी त्याच्या प्रीतीत....!!


आसुसले मन

तृप्त तृप्त झाली

तुजला भेटून

चैतन्य न्हाहली....!!


चेहऱ्यावरती

नवीनच तेज

गळा भेटीतही

होऊया सतेज....!!


भेट तुझी माझी

फुलवी आनंद

मधुर गोडवा

जणू गुलकंद....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance