चांदण्या
चांदण्या
बोलण्या तुज आता
न उसंत आहे जरी...
नक्षत्र आजही जुने...
गिरवतात बघ चांदण्या....
मोजून मांदियाळी एव्हढि...
जरी जळून बोटे गेली...
एक जागा राखीव तुजला...
ठेवतात बघ चांदण्या....
खरे खोटे रंग तुझे...
अंगात जे भिनविले...
निखळताना त्या धुंद राती...
हसतात बघ चांदण्या...
सुखावून घाव ओले....
जरी मंद वारे गेले....
खपल्यांची कुंपणे आजही
छेडतात बघ चांदण्या....
लावोनिया तर्क खोटे....
आरोप जितुके केले....
हिशोबांत बाकी माझ्या...
उरल्या बघ चांदण्या....
डवरून आलेच सर्व....
तरी ओठांवरती हसे...
हे तेच बहाणे जुने....
सांगतात बघ चांदण्या....
पुसवुन मांडल्या सोन्यासम
बाजारी जव पापण्या...
लावताना भाव त्याचा....
रडतात आज चांदण्या....

