मनातल्या आठवणी
मनातल्या आठवणी
आठवण येता तुझी
दव साचे पापणीत,
स्मृती पराग हळवे
भिजतात वेदनात.
काय बोलू काय लिहू?
शब्दांना येईना अकार,
जड झाअली पापणी
जड झाअले अंतर.
घेशील ना समजावून
माझ्या हळव्या भावना,
तुच एक जाणतोस
माझ्या अंतरीच्या खुणा!
मग तुझी आठवण येते
माझीच मी राहत नाही,
विसरायचे ठरवलं तरी
मन तयार होत नाही.
आजुबाजुची शांतता
कुजबुजत करू लागते,
तुझ्या माझ्या भेटींची
आठवण मनी जागते.
मग विसरायचे ठरवले
तरी हटकून येतात
त्या आठवणी,
निशब्द बोल होतात
वेदनेचे आर्त धनी.

