मी मला सन्मानित करते!..
मी मला सन्मानित करते!..


मी गर्भात होते,मी बाळ होते.मी मुलगी म्हणून जन्मले.
मी मुलगी म्हणून वाढले.मी कळी म्हणून फुलत होते.
कालांतराने मी वयात आले.मग मी तरूणी झाले.
मग माझे स्त्रीत रूपांतर झाले.मग मी पत्नी झाले.
मग बऱ्याच नात्याची लेबल अंगावर चिटकवली.
मग मी आई झाले.आज्जीही झाले.सगळी नाती निभावताना मी कोण आहे हेच विसरून गेले.
आजच्या या दिनी मीच माझा सत्कार करते.
आधी महिला दिनाच्या शुभेच्छा स्वत:लाच देऊन माझ्या स्त्रीत्वाचा सन्मान करते.स्वतःहाचे अस्तित्व जपण्याचा निर्धार करते. माझ्यातल्या मी ला सन्मानित करते.