तो पाऊस ती आणि तो
तो पाऊस ती आणि तो


त्याच्या हातात छत्री आणि तो,
रिमझिम पडणारा पाऊस आणि
मला भिजायची हौस,
मला आवडते भिजायला आणि याची धडपड
माझ्यावर छत्री धरायला
पाऊस मला खुणवायचा मला भिजायला बोलवायचा,
मी निघाले की मला हा आडवणार
मी विचारले की तो म्हणणार तुझं सर्दी पडसे कोण निस्तारणार
मग परत या न् त्या कारणाने याच्या हातात छत्री आणि आमची
स्वारी निघणार
तो पाऊस मला त्यात भिजायची भारी हौस
कधी कधी तर भर पावसात आम्ही निघणार खिडकीतून डोळे आम्हाला बघणार,
>त्यांचा तो चेष्टेचा विषय असणार हा कसला बालीश हट्ट म्हणून हसणार
पण तिकडे दुर्लक्ष करून आम्ही चालणार
परत तेच त्याच्या हातात छत्री तो माझ्या डोक्यावर धरणार,
करून मी हळूच चुकारपणा करून पावसात भिजणार
त्याच्या हातात छत्री तो रिमझिम पाऊस
मला त्यात चिंब भिजण्याची हौस
हा पावसाचा लपाछपीचा खेळ आम्ही दोघे मिळून खेळणार
कारण हा पाऊस तो पण आमच्या दोघांच्या मैत्रीचा साक्षीदार असणार
त्याच्या हातात छत्री आणि तो रिमझिम पडणारा पाऊस आणि मला त्या पावसात गुंतण्याची हौस