बालदिनांच्या निमित्ताने थोडे
बालदिनांच्या निमित्ताने थोडे


आई माझ्यासाठी एक काम करशील?
आज आॉफीसला न जाता सुट्टी घेऊन घरीच थांबशील?
आज आपण दोघे मिळून दोघांचाही
बालदिन साजरा करू,कारण काही वर्षांपूर्वी
तुही लहान होतीस हे तू नको विसरू
आज तु मला बालदिनांच्या खुप सार्या गिफ्ट
आणल्या आहेस कारण तु आता कमावतेस,
पण जेंव्हा तु लहान होतीस तेंव्हा या गोष्टी
तुला नाही मिळाल्या हे कसं विसरून जातेस?
माझ्या पिगी बॅंकेत साठलेल्या पैशांमधून
मी थोड्या गिफ्ट आणल्या आहेत खास तुझ्यासाठी
आता मीही थोडा मोठा झालो आहे
वयापेक्षा जास्त समंजस देखील,
म्हणून लहान असूनही थोडा जबाबदारीने
बोलतो रागावू नकोस बरका आई
पण खरे खरे सांगू तुला आई तुझ्यासारखे
अनाथ मुलांचे आईबाबा सगळ्यांनाच होता येत नाही
आपल्याला जे सुख नाही मिळालं ते
दुसऱ्यांना मिळवून देणे सोपे नसते काही