#कविता-लतेला मोक्षप्राप्ती
#कविता-लतेला मोक्षप्राप्ती
माघ शुद्ध पंचमीलाच म्हणजेच वसंत पंचमीलाच
स्वर्गातून आमंत्रण आले होते लतेला
एकच दिवस थांबते ग सरस्वती भुतलावर,
निरोपाचे सांत्वन करायला
लतेने आर्जव केली सरस्वतीला
अग पण दिनानाथ आणि माईचे डोळे तुझ्या वाटेला
असे काय करतेस पंचमीने लतेस पुसले
लतेने एकच दिवसाचे मुक्कामाचे मृत्यूकडे अश्वासन मागितले
येतेय ऊद्या षष्ठीला सांग मृतला थांबायला
रथसप्तमी म्हणाली,मी येऊ का रथात घेऊन लतेला
पण पंचमी आणि
सप्तमीचा संवाद अधुराच राहिला
मग षष्ठीने वारायम् रविवारीच सुर्योदयाशी संवाद साधला
माघ महिना धन्य पावला.उत्तरायणात माघ षष्ठीला लतेला मोक्ष मिळाला
माघ शुद्ध षष्ठीच्या वाटेला हा सौभाग्याचा क्षण आला
लतेचा जन्म धन्य धन्य पावला. स्वर्गात देखील याचा आनंदोत्सव झाला
कवेत घेऊन लेकिला तो दिनानाथ कृत्यकृत्य झाला
माईने हा लेकिचा सौभाग्याचा क्षण डोळ्यात साठविला
लतेच्या सप्तसुरात स्वर्ग देखील न्हाऊन निघाला