STORYMIRROR

Ujwala Rahane

Others

3  

Ujwala Rahane

Others

रमाला तिसरी मुलगीच झाली

रमाला तिसरी मुलगीच झाली

2 mins
164


रमाला तिसरीही मुलगी झाली

नवरा सासू दोघेही नाराज झाली सासू लगेच सुनेला बोलली


  जिथं पाप तिथे मुली आपोआप

रमावर शिव्यांची लाखोली तिनं वाहिली

कारण

 काय तर रमाला तिसरी मुलगी झाली


 रमाला रोज सासू बोलत होती

अमक्याला मुलगा झाला,

तमक्याला मुलगा झाला

त्याचे गुणगान गात होती

रमा आपली मुकाटपणे ऐकून घेत होती

तीची काय चूक होती?

फक्त तिला तिसरी पण मुलगीच झाली होती


  आल्या गेल्या समोर सासूबाईनें

रमालाच दोषी ठरवले कारण रमाला तिसरे अपत्य मुलगीच झाले 

 

 रमा ओली बाळंतीण बाजेवर बसून तिने आश्रू ढाळत होती

थोरली येऊन आईला रडू नकोस म्हणत होती

मधली येऊन चिमुकल्या हाताने रमाचे डोळे पुसत होती

नवजात धाकटी रमाच्या पदराखाली

मुचुमुचु दुध पित रमाच्या पदराशी खेळत होती


  सासू हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होती

तिच्या चेहऱ्यावरील रेघ थोडी सुध्दा हलत नव्हती

कारण रमाला तिसरी मुलगीच झाली होती


  ह्या सगळ्या गोष्टीचा करता

सवरता धर्मा लांबून सगळे बघत होता


  जसा काही या सगळ्यात त्याचा बिल्कूल दोषच नव्हता

तो आईला चक्कार शब्द बोलत नव्हता

एकंदरीत या सगळ्याचा दोष एकट्या रमाचाच होता


  परत वरती बोलला, 

आता दुसरी काही वेगळी सोय करतो

असे साळसूदपणे

रमाला म्हणाला


 याला सासूचा देखील पाठिंबा होता

कारण तिला देखील वंशाला दिवा हवा होता


 रमा कणाकणाने ढासळत गेली

तरी तिने मनाची तयारी केली

एके दिवशी अर्ध्या कच्चाबच्चाना उचलले

कोणालाही न कळवता घर सोडले

 

 अनाथाश्रमाचा आधार घेतला

तिघींसोबत अनाथाश्रमात आपला संसार थाटला


  लेकिंना स्वकष्टाने वाढवले

शिक्षण देऊन स्वतःहाच्या पायावर ऊभे केले


  स्वतःहा आपल्या सारख्या अनाथांना आश्रय देऊ लागली

आपली एक वेगळीच ओळख तिने समाजात निर्माण केली


 आज तिच्या आश्रमाच्या दारात तिचा नवरा पडला होता

अनाथ म्हणून कोणी तरी त्याला

आश्रमाच्या दारात आणून फेकला होता


 आश्रमातील मदतनीसांच्या सहकार्याने

तिने त्याला आत आणले

त्याने शुद्धीवर आल्यावर त्याने सांगितले

त्याचा सांगण्यानुसार रमाने तो कोण आहे ते ओळखले


 त्याने सांगितले माझ्या सुनेने आणि मुलाने मला

पुरते लुबाडले

बेघर करून घरातून हाकलून दिले


 आज त्याची हि अवस्था पाहून रमाला त्याची दया आली

आपलं कर्तव्य म्हणून तिने त्याची सेवा केली


 पण आपण कोण आहोत ही ओळख मात्र

त्याचा पासून तिने प्रकर्षाने लपवली


 पण देवाचे मात्र तिने आभार मानले

कारण आपल्या पोटी मुली जन्माला आल्या

म्हणूनच तर आपले भाग्य उजळले


Rate this content
Log in