"मनातलं बोल"
"मनातलं बोल"


प्रिय वाचकहो 'शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा' यातील दोन-तीन ओळीचा यात माझ्या अनूषंगाने वापर मी केला आहे. याची नोंद घ्यावी.
गृहताऱ्यांनी भरवली एकदा सभा. सूर्यनारायण होता सभापती मधोमध उभा.
पृथ्वी म्हणाली, मिञहो देवाघरची लूट आपणास निसर्ग मिळाला आहे भेट.
पाऊस म्हणाला, मी माझ्या वर्षावाने निर्जीव सृष्टी सजीव करेल. झाडे म्हणाली तूझ्या कर्तव्यात आम्ही सामिल तूझ्या कष्टाचे चीज करू, ऊंच भरारी घेऊ, पर्यावरणाला साथ देऊ, वेलीचा आधार बनू, थकल्या जिवाला देऊ सावली.
सागर सरितेनेही हीच रि गिरवली, तान्हल्यांची तृष्णा भागवू, पृथ्वीवर नंदनवन बनवू, सगळेच कामाला लागल. चंद्र सूर्य पृथ्वी ने आपापली कर्तव्यं निभावली.
सूर्यकिरणाने सृष्टी सजीव झाली.&n
bsp;पृथ्वीने आपल्या कवेत तिला जागा दिली. चंद्राच्या शितलतेने सर्वजण सुखावली. एकजूटीने सर्वजण कामाला लागली.
इमानेइतबारेआपआपल्या कामात रंगली. 'सूजलाम सुफलामचे' गीत गुणगुणून लागली.
अचानक मानवाची या सुखाला द्रष्ट लागली. मोकळी जागा दिसेल तीथे त्याने घर उभारली. मोकळा श्वास न मिळाल्यामुळे निसर्ग देवता गुदमरली.पर्यावरण व्यवस्था आपसूकच रास पावली.
ऐषाआरामात जेव्हा त्याचाही जीव गुदमरला मग मात्र मानव पूरता हदरला. आता शोधतोय मोकळी हवा. सांगतोय ओरडून झाडे लावा, झाडे लावा.
लेकरा तुझ्या सूखापायी तू निसर्गाशी खेळलास, धरणी माय रडते आहे रे धाय मोकलून,
फूकटच मिळाले म्हणून टाकलेस रे विस्कटून आता 'ना घर ना घाट' का अशी झाली तूझी गत,
आता कशालाच नाही उरली रे किंमत. कशालाच नाही उरली रे किंमत!!