"मी वसूंधरा"
"मी वसूंधरा"


मानवाचीच वसूंधरेला द्रष्ट लागली.
मोकळी जागा दिसेल तीथे त्याने घर उभारली
मोकळा श्वास न मिळाल्यामुळे निसर्ग देवता गुदमरली.
पर्यावरण व्यवस्थाआपसूकच रास पावली.
ऐषा आरामात जेव्हा त्याचाही जीव गुदमरला
मग मात्र मानव पूरता हदरला.
आता शोधतोय मोकळी हवा.
सांगतोय ओरडून झाडे लावा, झाडे लावा.
मानवा तुझ्या सूखापायी
तू निसर्गाशी खेळलास,
धरणी माय रडते आहे रे धाय मोकलून,
फूकटच मिळाले म्हणून टाकलेस रे विस्कटून.
आता 'ना घर ना घाट' का'
अशी झाली तूझी गत,आता
कशालाच नाही उरली रे किंमत.
कशालाच नाही उरली रे किंमत!
सगळे अगदी पाल्यापाचोळयागत.