जा लाडक्या तु सुखाने
जा लाडक्या तु सुखाने


दाटून कंठ येतो, जेव्हा घसा खवखवतो,
मग जोरात खोकला येतो, श्वास घेण्यास थोडा त्रास होतो,
मग तू जवळ आल्याचा मला नुसताच भास होतो, माझा जीव घाबरतो,
खेळशी हे खेळ जीव घेणे, जा ना लाडक्या कोरोना
संबोधितो तुला प्रेमाने जा लाडक्या आपुल्या घरी तु सुखाने.
तुझ्या भितीने हे आमचे रोजचे जीवन पहा तूच डोळ्याने,
कोणाच्या हातात संगणक, ओठावरी भ्रमणध्वनी.
भोवताली फाईलीचा पसारा,
रमतो दिवसभर याच्या सवे सांभाळीत आॉफीसचा बोजवारा.
परत हा आवरून ऑफिसचा पसारा घरकामालाही हातभार लावणे,
जातो थकून या सर्व कामकाजाचे किती हा अंत पाहतोस तुझ्याच नयनाने,
लाडक्या कोरोना आता तरी जारे परत आपल्या घरी सुखाने.
दूरदर्शनवर दिवसभर तुझेच गाणं,
लॉकडाऊनचा आता कहर झाला आता तुझ्याच भितीने,
ना कोणाकडे जाणेयेणे, ना कोणाला भेटणेही
कोणत्या जन्माची शिक्षा आम्हांस असे भोगणे,
जा लाड
क्या आपुल्या घरी तू रे जा आता लाडक्या कोरोना सुखाने.
तुझ्या आगमनाने झालो आता आम्हीही शहाणे,
धुऊन हाताला, कोणत्याही वस्तूला साफसूफ करूनच स्पर्श करणे,
स्वच्छतेचे संगीत आता मनी जागविले.
गर्दी न करणे व गर्दीच्या जागी न जाणे या मोहालाही अंगी लेवविले.
सगळे काढे औषधंदेखील तुझ्या नामी ग्रहण केले.
आता तरी लाडक्या कोरोना जा आपुल्या घरी तु सुखाने.
आता तुझाच एकेक सूर यावा भरून निरोपाच्या शब्दाने,
तुझ्यासाठी आसलेल्या नियमाचे नक्कीच होईल सुरेल गाणे.
पण जा लाडक्या परतुनी आपुल्या घरी तु सुखाने.
घेता तुझा निरोप जुळतील बैचेन मनाचे परत धागे,
तू परतशील जर निशंक मनाने तर न राहणार भितीचे सावट मागे,
तू धन परक्याचे ज्याचे तयास देणे,
मोकळ्या परी आम्ही इथे आता श्वास घेणे.
जा लाडक्या कोरोना जा लाडक्या
आपुल्या घरी तू जा लाडक्या सुखाने..