ताईचे पुस्तक
ताईचे पुस्तक
आज दुपारी खेळत खेळता
ताईचे मी पुस्तक चोरले,
धूम ठोकली लगबगीने
खाली बागेत येऊन खोलले..
सरळसोट अक्षरे ती
माझ्या डोळ्याभोवती फिरू लागली
गद्य पद्याची भव्य मालिका
थयथया नाच करू लागली
सपासप मग मी पाने उलटली
अर्ध्या पुस्तकाची पाने पालटली
अन मग दिसले चित्र माकडाचे
इवलेसे गोंडस अवघ्या दोन फुटांचे
डोळे वटारून बघत होते माझ्याकडे
माझे लक्ष त्याच्या वाकड्या शेपटीकडे
त्याची शेपटी बघूनी मला मात्र हसू सुटले
आवाजाने त्या माझे भिंग मात्र फुटले
ताई आली मग रागाने
तिच्या गालाची लाल लाल बुंदी झाली
मी धूम ठोकली तिथून
माझी पळता भुई थोडी झाली