ती
ती

1 min

189
तिला संपवायला
टोळीनिशी तयार झाले
गिधाड, पिसाळलेले
अगदी पाशवीही आले
ती न कधी संपली
न कधी संपणार
वेळेनुसार तिचे
रूप मात्र बदलणार
असेल ती कधी
ज्ञानरुपी सरस्वती
उपसता अस्त्र
होई कालिका असुराप्रती