नसेन मी
नसेन मी


तू शोधशील मजला
रानावनात,
माणसातल्या गर्दीत,
अन गर्दीतल्या माणसात,
आयुष्यभर चाललेल्या
प्रत्येक वाटेवरती,
त्या विसाव्याच्या ठिकाणी जिथे प्रत्येक प्रवासात
मी थांबले होते,
नसेन मी तिथे,
प्रत्येक गोष्टीत तूला मी भासेलही कदाचित
कारण प्रत्येक गोष्टीला स्पर्श करताना
भावना ओतल्या होत्या,
उमजल होत मजला की तू त्या प्रत्येक माणसांना
आणि वस्तुंना भेटशील माझ्याबद्दल विचारशील .....
मी भेटेन तूला त्या भावनेतूनच ,
मी असेलही आणि नसेलही,
पडशील तूही निपचित वाट माझी पहात
डोळ्यात जेव्हा तूझ्या स्पर्धा नसेल
धावती माणसं नसतील
त्या कोमल भावनांनी एकदा डोळे उघडून पाहशील
तेव्हा तिथेच असेन मी
पण नसेन मी .......