वृद्धाश्रमात
वृद्धाश्रमात
घुसमटून जातात अनेक श्वास
त्या वृद्धाश्रमात....
थरथरणारे हात आधार शोधतात
त्या वृद्धाश्रमात....
रडणारे डोळे अख्खी रात जागून काढतात
त्या वृद्धाश्रमात....
स्वतःच्याच प्रतिमा आरशात न पाहणारे चेहरे
त्या वृद्धाश्रमात....
थकून भागून सुरकतलेले ते पाय
त्या वृद्धाश्रमात....
पारावर बसून तासनतास वाट पाहणारे डोळे
त्या वृद्धाश्रमात....