तूला घडवताना
तूला घडवताना


तूला घडवताना
मी 'माती 'जाहले,
बहुअंगी तूझ्या रुपाची
मी 'आवृत्ती 'जाहले...
तूझ्या प्रत्येक यशाची
एक अनोखी 'स्मृती 'जाहले,
तूझ्या अपयशाच्या सुरात
नवीन एक' कृती' जाहले...
उमेदीच्या काळात तुझी
'शक्ती' बनून राहले,
कंटाळवाण्या तूझ्या तालाना
'सक्ती 'बनून राहले...
पोरक्या तूझ्या काही क्षणात
निराळी 'नाती' बनून पाहले,
रिकाम्या तूझ्या खिशाची
कधी' खाती' बनून पाहले..
तूझ्या आयुष्याच्या किनाऱ्याची
'रेती' बनून राहले,
अन प्रकाशणाऱ्या तूझ्या मनाची
'ज्योती' बनून पाहले...
खरंच गरज होती का
विशेष 'व्यक्ती' बनण्याची?
क्षण सारे निसटून गेले
'रीती' पोकळी बनून राहले..