माझ्या आत्म्या
माझ्या आत्म्या


अफाट वादळ
शरीर ते टिकेना
झेपेल का तुजला
माझ्या आत्म्या
अमाप जखमा
शरीरावरती दिसेना
सोसतील का तुजला
माझ्या आत्म्या
देतील धोके
अश्रू कोणी पुसेना
होशील का खंबीर
माझ्या आत्म्या
अडवतील मार्ग
बहू झाले लांडगे
सरसावशील का पुढे
माझ्या आत्म्या
थबकतील स्वप्ने
स्वतःच्या चुकांमुळे
उठशील का पुन्हा
माझ्या आत्म्या