नदी आणि मी
नदी आणि मी
नदीचा तीर...
शांत बसावं....
संवाद कुठलाच नाही....
तरीपण व्हावा नकळत.....
कळावा फक्त नदीला...
तिच्यावरची ती तरल शांतता
आपल्या संवादाने हलकेच विचल व्हावी
अन ती आपल्याला जाणवावी देखील......
अन तिच्याही चेहरयावर अगदी मंद हास्य उमटावे...
पण ती थांबणार नाही...
कारण वाहणे हा तिचा गुणधर्म .
मात्र ज्या थेंबाशी माझा संवाद झाला तो एकरूप झाला अख्या नदीशी.....
तीही आता 'मी'मय झाली....
तीही मिळेल मग सागराला जाऊन होईल
त्यांच्यातही अबोल संवाद न कळणारा पण भासणारा....
पुनवेचा चांद अन सागराचे उधाण,
प्रेमाची एक वेगळीच भरती येते...
सागराची ती सामावून घेण्याची कला पाहुनी
नदी त्यात एकरूप होते.