या वळणावर
या वळणावर


संकल्प सारी मेली
अन स्वप्न चढली सरणावर,
उरात तरी मशाल जागी
आयुष्याच्या या वळणावर....
कधी वाटे शिखरं चढावी
अन व्हावे आरूढ गगनावर,
पण पाय बांधिले जबाबदारीने
आयुष्याच्या या वळणावर...
कधी वाटे व्हावे कुंचल्यापरी
चित्र रेखाटावे पानांवर,
त्या चित्रांवर पाणी पडावे
आयुष्याच्या या वळणावर...
कधी वाटे बेधुंद व्हावे
अन नाचत राहावे तालावर,
पण मग शहाणे पाय थबकती
आयुष्याच्या या वळणावर....
कधी वाटे प्रेम करावे
शतदा या जन्मावर,
पण मरण आपुलकीचे वाटे
आयुष्याच्या या वळणावर...
पेटावी चेतनेची मशाल
विचारांच्या अंधारावर,
अन मग प्रबोधन घडावे
आयुष्याच्या या वळणावर...