STORYMIRROR

Raghu Deshpande

Tragedy

3  

Raghu Deshpande

Tragedy

समझौता...

समझौता...

1 min
260

सगळं कसं आलबेल आहे

नात थोड कमजोर आहे...


तुझ्या हातावरील मेंदीचा

रंग कसा अंधुक झाला

माझे गोंदलेले नाव हीं

फिके फिके होत आहे...! 


गुलाबी ओठांवर ही

पूर्वी सारखी लाली नाही

चेहरा हीं कोमेजला

डोळ्यांवर ग्लानी आहे...! 


असे कसें ओझे झाले

तुझ्या माझ्या नात्यांचे

काही विश्वास तू ठेव

थोडे नमते मी घेत आहे...! 


पूर्ण कुठे झाली अजून

स्वप्नें अपूरी राहीली

दिल्या घेतल्या वचनांची

ही अग्नीपरिक्षा आहे...! 


दूरचे ठेवून ध्येय

समझौता करु आपण

तुझ्याशिवाय जगताना

मी कुठे पूर्ण आहे...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy