कृष्ण सखा
कृष्ण सखा

1 min

108
गोल गोल वेलींचे
असे गुंफले कडे
बाहूपाश भोवती
भूल आजला पडे..१
बोल अति नेटके
भावगंध वेचले
रातराणी फुल ते
फांदीवरी लाजले..२
सळसळ पर्णांची
नेत्रपाती लवती
लवलव कोवळी
प्रेमभाव बोलती..३
मित्र म्हणू की सखा
खांदी शीर ठेवले
नकळत हातांनी
बोटात बोट गोवले..४
थरथर सर्वांगी
स्पर्शज्ञान सांगते
सोडणार ना कधी
वचनाते मागते..५
शरिर भिन्न परी
एकरूप जाहले
मर्म सुख दुःखाचे
तुझ्यासवे गोवले..६
साथ जन्मांतरीची
भेट यमुनातिरी
श्याम सावळा सखा
भाव जागे अंतरी..७